You are currently viewing महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही…

महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही…

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यावरून राजकारण चांगलचं शेकल आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यावर प्रतिक्रिया मांडली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने होत असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील रस्त्यांच्या कामांची पाहणी करत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीची नोटीस राजकीय हेतूने होत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आपसातील भेदभावापोटी या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे. महाविकास आघाडी त्याला घाबरत नाही. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे, असं सांगतानाच आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचं काम सुरूच ठेवणार असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा