कणकवली :
लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भ्रष्ट नेत्यांना संरक्षण देणाऱ्या तसेच लोकशाही आणि संविधान धोक्यात आणू पाहणाऱ्या असंवेदनशील मोदी सरकारला हद्दपार करावे, असे आवाहन उबाठा सेनेचे उपजिल्हाप्रमुख, समाजभूषण संदीप कदम यांनी केले आहे.
मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. अच्छे दिन आणणार म्हणुन सांगितले. मात्र जीएसटी च्या नावाखाली गोरगरिब जनतेला मोदी सरकारने लुटुन कंगाल केले. अनेक कंपण्या आणि नेत्यांवर ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स च्या माध्यमातुन धाडी टाकुन मेटाकुटीस आणून सदर भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षात घेतले आणि त्यांना क्लीन चीट दिली. ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्या कंपण्या आणि नेत्यांकडून कोट्यावधी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड माध्यमातून निवडणुक निधी घेतला.
मोदी सरकारने धर्माधर्मात तेढ निर्माण करून हिंदुराष्ट्राचे खोटे स्वप्न जनतेला दाखवले. भाजपा च्या सहयोगी संस्था स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकशाही बाबतीत अनुत्साही असतात. लोकशाही मुल्ये आणि संविधानाची उद्देशिका यांच्या विरोधी भुमिका मोदी सरकार आणि त्यांच्या सहयोगी संस्था घेत आहेत.
कर्नाटकचे सहावेळा खासदार असलेले अनंतकुमार हेगडे यांनी जाहीरपणे संविधान बदलण्यासाठी दोन तृतियांश भाजपाचे खासदार निवडून द्या असे जाहिरपणे सांगत आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार अस मोदी सरकार सांगत होते. सरकारने रोजगार उपलब्ध केला नाहीच तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारित रिक्त असणाऱ्या 35 लाख सरकारी कर्मचारी नोकर भरती ही केलेली नाही. काँग्रेसने काय केल अस म्हणणाऱ्या मोदी सरकारने सरकारी अनेक उदयोग विकले. तेथील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीतून बाहेर काढले. तसेच गो माता म्हणुन भावनिक वातावरण करणाऱ्या मोदी सरकारने बीफ निर्यातीत गेल्या दहावर्षात पहिला क्रमांक मिळवला. गेल्या आर्थिक वर्षात 42 लाख 50642 मेट्रीक टन बिफ निर्यात झाली आहे. भाजपाशासीत असणारी राज्येच मोठ्या प्रमाणात बीफ निर्यात करत आहेत. त्यावर कहर म्हणजे बीफ निर्यात करणाऱ्या ॲलेसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून 250 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे निवडणुक निधी मोदी सरकारने घेतला याची अंधभक्तांनी नोंद घ्यावी.
शाहुफुले आंबेडकर चळवळीतील जनतेला दादर येथील चैत्यभुमिचा विकास करणार म्हणुन नरेंद्र मोदींच्या उपस्थित सात वर्षापूर्वी भव्यदिव्य कार्यक्रम घेतला मात्र चैत्यभुमिचा कोणताही विकास झालेला नाही. राखीव जागा विरोधी भुमिका संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्या बाबत केंद्र सरकारने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. परदेशात जाणाऱ्या मागासवर्गिय मुलांची स्कॉलरशीप बंद करण्याची भुमिका केंद्रातील भाजपा सरकारने नी राज्य सरकारने घेतली आहे.
अश्या प्रकारे सर्वच बाबतीत बहुजन समाजाच्या विरोधी भुमिका घेणाऱ्या मोदी सरकारला पराभुत करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेद्वार विनायक राऊन यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन उबाठा सेनेचे उपजिल्हा प्रमुख संदीप कदम यांनी केले आहे.