बुलढाणा :
संत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त, दि. ३० एप्रिल रोजी एक दिवसीय उपक्रम घेण्यात आला. दरम्यान, ‘वाचन छंद प्रेमी साहित्य समूह’ आयोजित, ‘संत तुकडोजी महाराज’ उपक्रमास, लेखक-साहित्यिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन, विविधांगी लिखाण सादर केले.
‘सदर उपक्रमाचे परिक्षण, बुलढाणा जिल्हा कलाभुषण पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कवी-शाहिर मा. मनोहर पवार, केळकर यांनी केले.
यावेळी मा. स्वाती कुळकर्णी, नं भ. कोहळे, दिपककुमार सरदार किनगाव जट्टू यांनी सर्वोत्कृष्ट लिखाण केले. तर शाहीर मनोहर पवार (चिखली केळवदकर), सौ. वत्सला दुसेमोराणकर, विजय बोचरे, सौ.संगीता जितेंद्रसिह चव्हाण, प्रा.डॉ.पंढरीनाथ शेळके,कवी नयंन पऱ्हाड यांना, ‘उत्कृष्ट’ लिखाण केल्या बद्दल, सन्मान पत्र देण्यात आले.
दरम्यान, ‘वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह, संस्थापक बबनराव वि.आराख यांनी, सर्व साहित्यिकाचे आभार व्यक्त करत, साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.