*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”अवघा आनंद”*
आनंदाचे झाड मी लावेन मनांत
चराचरी सामावे सुवास आनंदIIधृII
तृणावरील दवबिंदूचा स्पर्श सुखद
सृष्टीतील पानांची सळसळ स्वच्छंद
मेघांची धावपळ पक्षांचा किलबिलाट
इंद्रधनुष्य दावी कल्पनांचा आनंदII1II
फुलांचा मिळे सुगंध माळेल केसांत
कोणी देईल भेट मुख भासे प्रसन्न
ईश्वरचरणी अर्पिता मिळे परमानंद
एक दिवसाचे जीवन देई आनंदII2II
प्रत्येक कार्यात मिळे श्रम समाधान
कष्टाचे चीज झाल्यावर मिळे आनंद
सहकार्य त्याग केल्याने लाभे तेजानंद
तुका सांगती आनंदाचे डोही तरंगे आनंदII3II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.