छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी आपल्या जिवाजी बाजी लावून स्वराज्य निर्माण केले व वाढवले. त्या ज्वलंत इतिहासाचे प्रतीक म्हणजे सह्याद्रीवर वसलेले गडकिल्ले.. ह्याच गडकिल्ल्यांचे जनमानसांत प्रसार प्रचार व्हावा व दुर्लक्षीत असलेल्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त शिवभक्त जावे व गडकिल्ल्यांचे स्वच्छता संवर्धन करावे ह्या हेतूने “वेध सह्याद्री”तर्फे दिनांक २४ व २५ डीसेम्बर रोजी पाली येथील सरसगड किल्ल्यावर श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात त्याच प्रमाणे दिशादर्शक फलक व किल्ल्याच्या नाकाशा चे फलक गडावर लावण्यात आले.
मोहिमे अंतर्गत सारसगडाच्या बुरुजावर कायमस्वरूपी भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. शिवभक्तांनी शिवरायांचा जयजयकार करत व भांडाऱ्याची उधळण करत संपूर्ण गड दणाणून सोडला.
यावेळी खोपोली येथील बालशहिर शौर्य निंबाळकरच्या पोवाड्यानि कार्यक्रमात अधिक भर पडली. मोहीम प्रमुख म्हाणून करण साळवी यांनी उत्तम रित्या मोहिमेची जबाबदारी पार पडली तसेच वेध सह्याद्रीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. ह्या मोहिमेसाठी पाली गावातील स्थानिक गावकऱ्यांचेही विशेष सहकार्य मिळाले.