You are currently viewing रेडी तील यशवंत गडाचे सवर्धना साठी भोसले कुटुंबियांकडून वस्तुरुपी मदत

रेडी तील यशवंत गडाचे सवर्धना साठी भोसले कुटुंबियांकडून वस्तुरुपी मदत

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथे असलेल्या ऐतिहासिक यशवंत गडाचे सवर्धन रेडी पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातील विविध गड संवर्धन करणाऱ्या संघटना एकत्र येऊन गड संवर्धनाचे कार्य गेली अनेक वर्ष करत आहेत. परंतु गडावर वाढलेल्या झाडी मुळे या वास्तूचे दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. यावेळी गड संवर्धनासाठी शिवप्रेमींची गरज ओळखून श्री देव पाटेकर पंचायतन तिरोडा यांच्या वतीने भोसले कुटुंबियांकडून गड सवर्धनासाठी ग्रास कटर आणि वूड कटर अशी वस्तुरुपी मदत  करण्यात आली आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री श्री. प्रविण प्रतापराव भोसले यांचे पुतणे अँड. श्री संग्रामसिंह भोसले यांच्या कुटुंबाकडून स्वतःहून पुढाकार घेऊन ही मदत करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र भोसले व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दोन्ही वस्तूंचे पूजन करण्यात आले आहे.

यावेळी भोसले कुटुंबीयांनी स्वतः पुढे येत केलेल्या या सहकार्याबद्दल त्यांचे आभार उपस्थित शिवप्रेमींनी मानले आहेत. असाच विचार समाजातील सर्वांनी केल्यास जिल्ह्यातील निवती, यशवंतगड, रामगड, हनुमंत गड, इत्यादी सर्व गडाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या सर्व दुर्गप्रेमींना गड संवर्धन करण्यास सहकार्य होऊन त्यांचे मनोबल वाढून, जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जतन होईल. असे आवाहन शिवप्रेमींनी केले आहे. तसेच गड संवर्धनाच्या कामात जिल्ह्यातील ज्या व्यक्तींना सहभागी व्ह्याचे आहे अशा व्यक्तींनी आपली नावे व गाव ९६०७३८१७१६ या क्रमांकावर व्हाट्सअप करावी असे आवाहन देखील केले आहे.

यावेळी राजु शेणई, सुकन्या परब, सेजल राऊत, संपदा राणे, सौरभ नागोळकर , विशाल राणे, पपू तेंडुलकर, अमेय गावडे, भूषण मांजरेकर, प्रथमेश परब, सुमित राणे, प्रभाकर परब, निखिल तानवडे , मनीष राणे, एकनाथ जाधव, ओंकार नाडकर्णी, योगेश मांजरेकर, आदित्य सावंत आदी शिवप्रेमी उपस्थित होते. आज झालेल्या गड संवर्धन मोहिमेस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ने देखील सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा