You are currently viewing भोंसले नॉलेज सिटी- फार्मसी महाविद्यालय, सावंतवाडीच्या ४० विद्यार्थ्यांची सिप्ला लिमिटेडमध्ये निवड

भोंसले नॉलेज सिटी- फार्मसी महाविद्यालय, सावंतवाडीच्या ४० विद्यार्थ्यांची सिप्ला लिमिटेडमध्ये निवड

सावंतवाडी :

येथील यशवंतराव भोसले कॉलेजच्या प्रशिक्षण आणि नेमणूक विभागाच्या प्रयत्नाने सिप्ला लिमिटेड, गोवा कंपनीसोबत शनिवार, दि. २७ एप्रिल २०२४ रोजी घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अतंर्गत मुलाखतींमधून भोसले फार्मसी कॉलेजच्या ३७ नवोदित फार्मासिस्टची आणि ३ पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची अंतिम निकाला अगोदरच निवड केली आहे, अशी माहिती यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या वतीने देण्यात आली आहे. भारतातील औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी सिप्लाकडून ह्या ४० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली.

यशवंतराव भोसले कॉलेजला नॅक मान्यता हा दर्जा प्राप्त असल्यामुळे शाखा निहाय वेगवेगळ्या कंपन्यांना अपेक्षित असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव अभ्यासक्रम रचनेत केला जात असल्यामुळे कंपन्यांना कार्यक्षम औषधनिर्माते मिळत आहे. सिप्ला आणि यशवंतराव भोसले कॉलेज यांच्या सामांगिक करारातून हे ४ थे वर्ष आहे ज्यातून यशवंतराव भोसले कॉलेजने तंत्रशिक्षित कुशल व निपुण विद्यार्थी कंपनीला दिले आहेत. गेल्या मागील ३ वर्षातील बरेच उमेदवार हे प्रशिक्षणार्थी या पदावरून कायमस्वरूपी पदावर पदोन्नत झालेले आहेत.

बी. फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी. फार्मसी प्राचार्य श्री. सत्यजित साठे, यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य. डॉ. रमण बाणे, उप-प्राचार्य श्री. गजानन भोसले यांनी समाधान व्यक्त केले तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी प्रशिक्षण आणि नेमणूक विभाग प्रमुख प्रा. मिलिंद देसाई, प्रा. नमिता भोसले, प्रा. संयुजा निकम आदी उपस्थित होते.

श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी चे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत भोसले, अॅड. अस्मिता सावंतभोंसले, सचिव संजिव देसाई, प्रशासकीय समन्वयक सुनेत्रा फाटक तसेच पालक व सर्व भागधारक यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा