You are currently viewing दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरिता शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे पाठपुरावा !!

दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरिता शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे पाठपुरावा !!

दौंड :

दौंड तालुक्यातील पानशेत, वरसगाव, उजनी, नाझरे, वीर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणेकामी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळासह दि.२५ रोजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे पुणे येथे भेट घेतली. यावेळी पासलकर यांनी प्रकल्पग्रस्तांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध प्रश्न मार्गी लावणेबाबत मंत्री महोदयांचे बैठकीत चर्चा केली.

यावेळी पानशेत धरण व वरसगाव धरण प्रकल्पग्रस्तांना शासन परिपत्रक क्र.आरपीए १०७१/४१/५८३/र-१ दि.०९/०५/१९७३ परिपत्रकामधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांस जमीन वाटप करण्याचे निर्देशाची प्रशासनाकडून अंमल बजावणी होत नसलेबाबत. पानशेत व वरसगाव धरण प्रकल्पामुळे विस्थापित प्रकल्पग्रस्तांना दौंड तालुक्यात वाटप जमिनी व भूखंडाचे ७/१२ वरील इतर हक्कातील नवीन शर्त शेरे कमी करणेबाबत. पुनर्वसित गावठाणात वाटप रहीवासी भुखंडामध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत. दौंड तालुक्यातील मा. जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन (जमीन) पुणे यांचे नावे असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढणेबाबत.

दौंड तालुक्यातील राजेगाव, मलठण, लोणारवाडी, दौंड, लिंगाळी, गोपाळवाडी, या महसुली गावात उजनी प्रकल्पग्रस्तांना पूर्वी पर्यायी जमीन व भूखंड वाटप केलेले असताना तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीचे बदल्यात सोलापूर येथे पर्यायी जमीन व भूखंड मागणी करणेस कळविले जात असल्याची बाब यावेळी पुनर्वसन मंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन दौंड तालुक्यातच प्राधान्याने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी ही पासलकर यांनी यावेळी केली.

#जगदीश का. काशिकर,
*मुक्त पत्रकार व नाेकरी/लाॅ-कायदे सल्लागार*
मुबंई व थाने शहर/जिल्हा.
व्हाटसअप:- 9768425757
********************

यावेळी शिवसेना युवा सेना प्रमुख समिर भोईटे ,उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण ,शाखा प्रमुख दिपक भंडलकर आदि उपस्थित होते.

दौंड : दौंड तालुक्यातील पानशेत, वरसगाव, उजनी, नाझरे, वीर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणेकामी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळासह दि.२५ रोजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे पुणे येथे भेट घेतली. यावेळी पासलकर यांनी प्रकल्पग्रस्तांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध प्रश्न मार्गी लावणेबाबत मंत्री महोदयांचे बैठकीत चर्चा केली.

यावेळी पानशेत धरण व वरसगाव धरण प्रकल्पग्रस्तांना शासन परिपत्रक क्र.आरपीए १०७१/४१/५८३/र-१ दि.०९/०५/१९७३ परिपत्रकामधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांस जमीन वाटप करण्याचे निर्देशाची प्रशासनाकडून अंमल बजावणी होत नसलेबाबत. पानशेत व वरसगाव धरण प्रकल्पामुळे विस्थापित प्रकल्पग्रस्तांना दौंड तालुक्यात वाटप जमिनी व भूखंडाचे ७/१२ वरील इतर हक्कातील नवीन शर्त शेरे कमी करणेबाबत. पुनर्वसित गावठाणात वाटप रहीवासी भुखंडामध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत. दौंड तालुक्यातील मा. जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन (जमीन) पुणे यांचे नावे असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढणेबाबत.

दौंड तालुक्यातील राजेगाव, मलठण, लोणारवाडी, दौंड, लिंगाळी, गोपाळवाडी, या महसुली गावात उजनी प्रकल्पग्रस्तांना पूर्वी पर्यायी जमीन व भूखंड वाटप केलेले असताना तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीचे बदल्यात सोलापूर येथे पर्यायी जमीन व भूखंड मागणी करणेस कळविले जात असल्याची बाब यावेळी पुनर्वसन मंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन दौंड तालुक्यातच प्राधान्याने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी ही पासलकर यांनी यावेळी केली.

यावेळी शिवसेना युवा सेना प्रमुख समिर भोईटे ,उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण ,शाखा प्रमुख दिपक भंडलकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 4 =