You are currently viewing सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात युवा नेते विशाल परब यांची प्रचारात आघाडी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात युवा नेते विशाल परब यांची प्रचारात आघाडी

*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात युवा नेते विशाल परब यांची प्रचारात आघाडी*

*गावागावात उबाठा सेनेचे *कार्यकर्त करतात भाजपात पक्ष प्रवेश*

सावंतवाडी

कोकणच्या विकासासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक रक्ताचा थेंब खर्ची केला त्या नारायण राणे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी शिरशिंगे गावातून नव्वद टक्के मतदान द्या असे आवाहन युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरशिंगे गावात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक श्री परब यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी उबाठा सेनेतील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर सरपंच दिपक राऊळ, उपसरपंच सचिन धोंड, जिल्हा बॅक संचालक रविद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, पुंडलिक कदम, केतन आजगावकर, जेष्ठ ग्रामस्थ नारायण राऊळ आदी उपस्थित होते.
श्री परब पुढे म्हणाले,
निवडणुका या पाच वर्षांनी येतात आणि जातात शिंरशिंगे गावात मागील काही वर्षांची परिस्थिती पाहता येथे साधे पक्के रस्ते नव्हेत मात्र येथील जनतेच्या माध्यमातून ही कामे मार्गी लागली. यासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची असून गावाच्या विकासात साथ देण्यार्या राजकीय पक्षाच्या पाठीमागे राहणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्ष हा नेहमी विकासाची घौडदौड करत आला असून विकासकामे तळागाळापर्यंत पोहचवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी येणाऱ्या सात तारखेला शिरसिंगे गावातून 90% पेक्षा जास्त मतदान नारायण राणेंना द्या.भाजपाचे सगळे व्यक्ती शब्द पाळतात मीही शब्द दिल्याप्रमाणे पाळणारा व्यक्ती आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी येणाऱ्या काळात आम्ही तुमच्या सोबत राहू. यावेळी रविद्र मडगावकर व पंढरी राऊळ यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान ग्रामस्थ तानाजी धोंड,लक्ष्मण धोंड,अंकुश धोंड,संजय मोरजकर,वसंत धोंड आदींनी श्री परब यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा