फोंडाघाट हवेली नगर येथील गटाराचे काम अर्धवट टाकुन पोट ठेकेदार फरार ….
निवडणुकीपूर्वी काम न झाल्यास मतदानावर बहिष्कार व रास्ता रोको आंदोलन करणार – अजित नाडकर्णी यांचा इशारा
फोंडाघाट
फोंडाघाट हवेली नगर उत्तर अणि दक्षीण विभाग येथील गटाराचे काम अर्धवट टाकुन पोट ठेकेदार पळाला. प्रचार करताना ही बाब लक्षात आली.अजित नाडकर्णी यांनी कणकवली सार्वजनीक बांधकाम उपअभियंता श्री.सर्वगौड यांना ही माहीती दिली. दोन्ही बाजुचे १ किलोमीटर गटाराचे खोदकाम करुन पोट ठेकेदार फरार झाला आहे. जर काम सुरु झाले नाही तर ७ मे निवडणुकीच्या दिवशी रास्ता रोको आंदोलन आणि मतदानावर होणार बहिष्कार टाकणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. त्यापुर्वी मार्ग काढतो असे श्री.सर्वगौड यांनी शब्द दिला आहे. काम अर्धवट सोडणा-याना काळ्या यादीत टाका. या गटारात ४ दिवसात लहान मोठे असे सहा ६ अपघात झाले. रविवार पुर्वी गटाराचे काम पुर्ण करा.अपघात झाल्यास प्रशासन जबाबदार राहाणार असल्याचे निवेदन अजित नाडकर्णी यांनी सादर केले आहे.