*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलमोहर*
असा बहर
उन्हात फुललेला
गुलमोहर….।।
झाड निष्पर्ण
उन्हं आहे झेलत
तरी हासत…..।।
पिवळ्या लाल
कळ्यांचे गुच्छ झुले
मजेत डुले…..।।
लाल गालिचा
काळ्या सडकेवर
अती सुंदर….।।
खुले वसंत
वृक्ष लालभडक
भाळी तिलक….।।
तप्त उन्हात
गुलमोहर छान
आनंदगान…।।
००००००००००००🍁🌿
अरुणा दुद्दलवार
अरुणिमा✍️