You are currently viewing कणकवलीत मानवी साखळीद्वारे मतदानाबाबत जागृती…

कणकवलीत मानवी साखळीद्वारे मतदानाबाबत जागृती…

कणकवलीत मानवी साखळीद्वारे मतदानाबाबत जागृती…

कणकवली

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा विद्यामंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांनी ‘मतदान करा’ची मानवी साखळी तयार केली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला नगरपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभले.
यावेळी मुख्याध्यापक पी.जे.कांबळे, शिक्षिका व्ही.बी जाधव, वि.वी.बर्डे, नेताजी जाधव, जनार्दन शेळके, दिनेश मोर्ये, विद्या शिरसाट, नेहा सावंत, वेदाती तायशेटे, वैभवी हरमलकर, श्रीमती कदम, शिक्षक व नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून विद्यामंदिर प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रसाद राणे यांच्या नियोजनातून मतदानाची जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा