बांदा तेरेखोल नदीपात्रात आढळला मृतदेह…
बांदा
बांदा देऊळवाडी येथील रवींद्र सुपल (वय ५९) यांचा मृतदेह काल रात्री उशीर येथील तेरेखोल नदीपात्रात आढळला. काल दुपारपासून ते घरातून बेपत्ता होता.
याबाबतची खबर त्यांचा मुलगा रोहित याने बांदा पोलिसात दिली. काल (सोमवार) दुपारपासून ते घरातून कोणालाही न सांगता निघून गेले. त्यांची घरातील व्यक्तींनी, नातेवाईकांनी तसेच शेजाऱ्यांनी शोधाशोध केली. मात्र ते सापडून आले नाहीत. रात्री उशिरा आरोसबाग येथे तेरेखोल नदीपात्राशेजारी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. पोलीस व स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. आज सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी मृतदेहाचे विच्छेदन करत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
बांदा पोलिसात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.