You are currently viewing ज्येष्ठ कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना

ज्येष्ठ कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना

*ज्येष्ठ कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना*

*एक दिवस असाही…..*

एक दिवस असाही
उजाडतो कधीतरी…..
निशेच्या कुशीतून सुस्त आळसावलेला
अजुनही त्याला असते वाटत
रहावे लोळत दुलईच्या ऊबेत
मऊशार… बदलत कुशी
मध्यान्हीच उन्हं येतं डोळ्यांवर
वाजलेले असतात बारा नि,
त्याचेही वाजतात बारा….!
मग उठतो तो डोकावत घडाळ्यात ….
टिकटिक ती चालूच असते अविरत
पण, आज त्याला जगायचे असते
अगदी मुक्त मनसोक्त……!
मुक्त दिवस साजरा असतो करायचा…
रोजच्या चाकोरीच्या रहाटात नसते
जायचे असते पिचत… रगडत
नको ती रोजची ७.१२ ची ट्रेन
परततानाची संध्याकाळी पुन्हा ती ७.३५….!
दमलेल्या थकलेल्या पावलांनी रेटणारा तोच तो रस्ता….
कळकट मळकट घामट वासाच्या त्याच त्या डब्यात स्वतःच्या देहाच्या वळकटीला कसंबसं सामावून ढकलत
प्रवेश मिळवायचा…..!
नऊपर्यंत घर नावाच्या निवाऱ्यात आल्यावर हाशहुश करत….
बायको मुलाबरोबर दोन घास पोटाच्या खळगीत द्यायचे ढकलून नि
मग ती हवीहवीशी झोप….
काळझोप….! वाटते मनाच्या गाभ्यातली सुप्त इच्छा
येऊ दे रे ती एकदाची काळझोप…..!!.. ह्या संसारसागराच्या
पल्याड नेणारी……..
पण आजचा मात्र दिवस त्याचा स्वतःचा होता आज खास त्याचा….!
एक दिवस असाही…
येतो अवचित असाच वळव्याच्या पावसासारखा…..
रणरणीत उन्हात शीतल वर्षाव करत
त्या एका दिवशी तो त्याचा तो मनमुराद राहतो भटकत..
उगाचच शुष्क रानमाळावरील कातळाला निरखत…
अंतरीच्या सुप्त इच्छा बोलू लागतात काळ्या पाषाणाशी….
एखादी तरी हिरवीगार पात उगवेल काय त्यावर…. प्रभातीच्या दवात मस्त
भिजून राहील का डोलत एखादे त्यावर इवलेसे फुल…. आणि…,
सांजवेळी घरी आल्यावर तो घराच्या प्रत्येक कोपऱ्याचे, भितीवरल्या रंग उडालेल्या पापुद्राचे बसतो निरीक्षण करत त्याचा तो……
येतं मनात तेव्हा असा उजाडू दे एक दिवस असाही….
घडयाळातल्या तिन्ही काट्यांनी सुट्टी घ्यावी केव्हातरी…
रजनीच्या तिमीरासवे सुर्यानेही जावे पार क्षितीजाच्या पल्याड…..
मग काय नुसता. Time Pass…..!!

*मानसी जामसंडेकर, गोवा*

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा