You are currently viewing कूपवडे पंचक्रोशीत राष्ट्रवादीकडून नारायण राणेंच्या प्रचाराला सुरुवात…

कूपवडे पंचक्रोशीत राष्ट्रवादीकडून नारायण राणेंच्या प्रचाराला सुरुवात…

कूपवडे पंचक्रोशीत राष्ट्रवादीकडून नारायण राणेंच्या प्रचाराला सुरुवात…

कुडाळ

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील कूपवडे पंचक्रोशीत जनतेशी संवाद साधला. राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी संघटनेसहित आपण स्वतः प्रचाराचा झंजावात चालू ठेवणार आहोत असे त्यांनी सांगितले.

देवगड, मालवण मध्ये झालेल्या प्रचारानंतर त्यांनी कुडाळ तालुक्यातील कुपवडे पंचक्रोशीतील जनतेशी संवाद साधला. येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी बंटी परब यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या व राणे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा प्रतिनिधी निशिकांत कडूलकर, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत व मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा