*ज्येष्ठ कवयित्री सौ.कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आभासी जग*
आहे आभासी जग हे
नाते उगाच जोडावे
स्वार्थ साधतात काही
यापासून दूर व्हावे
रडू का यावे नयनी
अशा स्वार्थी लोकांसाठी
प्रेम द्यावे अशांनाच
साथ ज्यांची तुम्हासाठी
खोटे वागून तुम्हाला
काय मिळत असते
फक्त पश्चाताप होतो
बाकी काहीच नसते
म्हणूनच नीट वागा
आहे जगात आभास
जोडा चांगले संबंध
त्याने वाढेल विश्वास
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक