श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज तर्फे पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न
सावंतवाडी.
श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडी येथे दिनांक 29 मार्च रोजी पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद सिं.जी.शी.प्र.मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी भूषवले व कार्यक्रमाला सौ.शुभदादेवी खेम सावंत भोसले, लखम खेमसावंत भोसले, ॲड. शामराव सावंत,जयप्रकाश सावंत, डॉ. सतिश सावंत तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते व प्रमुख अतिथी म्हणून कुडाळ येथील ज्येष्ठ विधीज्ञ श्री. अजित भणगे व सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष विधीज्ञ परिमल नाईक हे उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये वर्ष 2022-23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कोर्टामध्ये वकील म्हणून कसे वागावे, कोणते शिष्टाचार पाळावेत याबाबत ज्येष्ठविधीज्ञ श्री भणगे यांनी मार्गदर्शन केले. तर विधीज्ञ श्री. नाईक यांनी विद्यार्थ्यांचा वकिली व्यवसायात पदार्पण करण्यासाठीचा उत्साह वाढवला.याचबरोबर कार्यक्रमाला प्रथम द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयामार्फत वर्षभरात घेण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे व कार्यक्रमांचे बक्षीस वितरणही करण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांचा हुरूप वाढला. याचबरोबर तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रमही पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर अश्विनी लेले यांनी केले. असाच भव्य कार्यक्रम यापुढेही भविष्यात नेहमी करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*संवाद मीडिया*
*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣
*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹
*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️
*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/
*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️
*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡
*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*
*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*
*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*
*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*