प. पू. भाऊ मसुरकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम व आफळे यांचे किर्तन…
सावंतवाडी :-
सावंतवाडी येथील प. पू. भाऊ मसुरकर जन्मशताब्दी वर्ष २०२४-२५ सोहळा दि.३० एप्रिल व १ मे रोजी विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विष्णूयाग, भजन संध्या, श्री विठ्ठल रखुमाई महापूजा आणि ह. भ. प. चारूदत्त आफळे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
प. पू. भाऊ मसुरकर जन्मशताब्दी समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती सेवानिवृत्त राज्य शासनाचे सचिव अविनाश सुभेदार व संजय ठाकूर यांनी दिली. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थितीत रहाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मंगळवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता विष्णूयाग श्री. बकले गुरुजी गोवा यांच्या पावन हस्ते होईल. संध्याकाळी सहा वाजता भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये अभंग, भक्ती गीते, भावगीते यांचा सुरेल नजराणा अलंकार निर्मित रसिक रंजन कोल्हापूर सादर करणार आहेत.
बुधवार दि.१ मे रोजी सकाळी सहा वाजता श्री विठ्ठल रखुमाई महापूजा सेवानिवृत्त राज्य शासनाचे सचिव सौ. व श्री. अविनाश सुभेदार यांच्या शुभहस्ते होईल. संध्याकाळी सहा वाजता ह. भ. प. चारुदत्त आफळे राष्ट्रीय कीर्तनकार यांचे अंतकरणाचा ठाव घेणारे सुश्राव्य कीर्तन होईल. तसेच मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल मंदिराच्या शुभकार्यास योगदान देणाऱ्यांचा सत्कारही प. पू. भाऊ मसुरकर जन्मशताब्दी समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.