*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठ्या कपाळावरच्या …!!*
कधी कधी कपाळाच्या आठीच्या
प्रेमांत ही मी अडकतो
मनांत झेलता येईल गं तुला !
तिच्या मी आधिन होतो…
तिच्या संकेताची वाट न पाहता
माझी वाट मोकळी करून देतो
मनाच्या डोहाचा ताबा घेत
तिला मी माझ्याकडे खेचतो…!
प्रणयरंगात आठ्या विस्तारल्या
मगचं मी तिला शरण जातो
साचलेलं जाळं हळुवार दूर करत
वेड्यागत प्रेमांत आकंठ बुडतो ..!
माझ्या आशिकीला आठ्यांचा
अडसर झेलता नाही जरी आला
तिला आलिंगनात ओढून घेत
आठ्यांवर प्रेमी चुंबन देतो ! तिला
आताश्या तिचं! आठ्या कपाळावरच्या
उगाच मला दाखवत असते…
आमंत्रण असत कां? उमगलं नाही
आठ्या मात्र वाढवत जाते..!!
बाबा ठाकूर धन्यवाद