You are currently viewing आमदार नितेश यांनी केला झिप लाईन प्रकल्पाचा शुभारंभ

आमदार नितेश यांनी केला झिप लाईन प्रकल्पाचा शुभारंभ

वाईच्या धर्तीवर देवगड मध्ये अनेक चित्रपटाची शूटिंग या पुढे भविष्यात होणार

देवगड :-

नव्याने सुरू झालेल्या झिप लाईन प्रकल्पाने देवगडच्या पर्यटनात मानाचा तुरा खोवला. देवगड मध्ये अनेक चित्रपटाची शूटिंग या पुढे भविष्यात होणार आहेत. तसेच देवगड मध्ये गो कार्टिंग प्रकल्पाचे नियोजनही झाले असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे दिली.
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज झिप लाईन चा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रकल्पाचे संचालक श्रीकांत जोईल यांच्या भगिनी सुगंधा जोईल त्यांचे सर्व कुटुंबीय माजी आमदार एडवोकेट अजित गोगटे सभापती सुनील पारकर नगराध्यक्ष सौ प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजा वालकर, उपसभापती डॉक्टर अमोल तेली, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले जिल्हा उपाधाक्ष बाळ खडपे,तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, रवी पाळेकर, प्रकाश राणे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,उमेश कनेरकर सर्व नगरसेवक उपस्थित होते

यावेळी माजी आमदार अजित गोगटे यांनी झिप लाईन प्रकल्पाचा आनंद उपभोगला या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रियांका साळकर यांनी श्रीफळ वाढवून तर फित कापून आमदार नितेश राणे यांनी केले
आमदार नितेश राणे यांनी बोलताना सिंधुदुर्ग हा पर्यटन हब बनावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मालवण हे वेगळ्या कारणासाठी देवगड हे वेगळ्या कारणासाठी तर वेंगुर्ले हे वेगळ्या कारणासाठी जर पर्यटकांच्या पसंतीला उतरले तर संपूर्ण सिंधुदुर्गचा विकास होईल
भारतातील पहिले कंटेनर थिएटर देवगड मध्ये झाले भारतातील किनारपट्टी वरील पहिला झिप लाइन मार्ग पहिल्यांदा देवगड मध्ये झाला देवगड मध्ये असलेले हे गार्डन हे एकमेवाद्वितीय आहे, किनारपट्टीला असलेले वॅक्स म्युझियमही देवगड मध्ये आहे यामुळे देवगडच्या पर्यटनात कायमच भर पडत आली आहे स्थानिकांना रोजगार मिळावा व त्यातून स्वावलंबन यावे ही माझी अपेक्षा असल्याचे आमदार नितेश राणे यांनी बोलून दाखवले श्रीकांत जोईल यांनी बोलताना मी इथलाच भूमिपुत्र असून पर्यटन व पर्यावरण यासाठी काम करण्याची अपेक्षा ठेवून या ठिकाणी आलो आहे भविष्यात देवगडला पर्यटनासाठी चांगली संधी आहे श्रीकांत जोईल यांनी बोलताना आपण बारा स्थानिक कुटुंबियांना रोजगार दिला असे भाषणात सांगितले नगराध्यक्ष प्रियांका साळकर यांनी आपले विचार मांडले

प्रतिक्रिया व्यक्त करा