You are currently viewing लग्नाचा बहाणा करुन फसवणूक करणा-या टोळीतील संशयित आरोपी अजिझ सुलेमान नाईक यांना अटकपूर्व जामिन मंजूर

लग्नाचा बहाणा करुन फसवणूक करणा-या टोळीतील संशयित आरोपी अजिझ सुलेमान नाईक यांना अटकपूर्व जामिन मंजूर

लग्नाचा बहाणा करुन फसवणूक करणा-या टोळीतील संशयित आरोपी अजिझ सुलेमान नाईक यांना अटकपूर्व जामिन मंजूर

ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तीवाद

लग्नाचा बहाणा करुन फसवणूक करणा-या टोळीतील आरोपी (प्रमुख एजंट) असलेला अजिझ सुलेमान नाईक, राहा. कुडाळ, माणगाव याला ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्री. एच. बी. गायकवाड
यांनी अटकपूर्व जामिन मंजूर केला. सदर आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी युक्तीवाद केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ तालुक्यातील एका ४२ वर्षीय व्यक्तीला लग्नाचा बहाणा करुन त्याची सुमारे १ लाख ४० हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या या टोळीतील संशयित आरोपी संतोष काकडे (वय ३७, रा. शिरोली, ता. करविर, जि. कोल्हापूर), संतोष जगदाळे (वय ४०, राहा. दहीवाडी ता. मान, जि.
सातारा), विशाल थोरात (वय ३४, रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), माधुरी केदारी उर्फ भारती ठोंबरे (वय ३२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), ज्योती शेलार (वय ४३, रा. ता. वाई, जि.
सातारा), मंगल महापूर (वय ४८, रा. हेर्ले हातकलंगले, जि. कोल्हापूर), ममता पगारे (वय ३७, रा. शिर्डी अहमदनगर), किरण पगारे (वय ४७, रा. शिर्डी अहमदनगर), प्रमुख संशयित रुपाली पाटील (वय ३५, रा. शिर्डी अहमदनगर) यांना अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून ताब्यात घेत अटक करुन यापूर्वी पोलीस कस्टडी व न्यायालयीन कस्टडी होवून जामिन मंजूर झालेला आहे.
दरम्यान आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यानंतर नजरेआड होते व त्यांनी दिनांक २७/०३/२०२४ रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
आरोपीच्या वकीलांचा युक्तीवादात आरोपी हे सुरुवाती पासूनच तपासकामात मदत करत आहेत. तसेच आरोपी यांच्याकडून रिकव्हरी होणे बाकी नाही. त्यामुळे आरोपीची कस्टोडियल इंट्रोगेशनची आवश्यकता आहे असा युक्तीवाद करण्यात आला हा युक्तीवाद ग्राह्य मानून सदर आरोपीचे अटकपूर्व जामिन मंजूर केलेला आहे.

*संवाद मीडिया*

*BCA प्रवेश प्रक्रिया सुरू 2024- 2025.*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न

📌*BCA* प्रवेश प्रक्रिया 2024- 2025.

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी, कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

📌CET साठी महाविद्यालयामध्ये दिनांक 30 एप्रिल ते 3 मे 2024 पर्यंत मार्गदर्शन वर्ग घेतले जातील.

📌BCA CET च्या मार्गदर्शन करिता खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करावे.

https://chat.whatsapp.com/ExFrcFtjJvkExBD5AIgnK0

अधिक माहितीसाठी :
7972997567
9420274119
या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/133601/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
;

प्रतिक्रिया व्यक्त करा