You are currently viewing तिर्लोट येथे आंबा बागेला भीषण आग लाखोंचे नुकसान ; शॉर्टसर्किटमुळे लागली आग

तिर्लोट येथे आंबा बागेला भीषण आग लाखोंचे नुकसान ; शॉर्टसर्किटमुळे लागली आग

तिर्लोट येथे आंबा बागेला भीषण आग लाखोंचे नुकसान ; शॉर्टसर्किटमुळे लागली आग

तिर्लोट येथे आंबा बागेला भीषण आग लाखोंचे नुकसान ; शॉर्टसर्किटमुळे लागली आग

देवगड

देवगड तालुक्यातील तिर्लोट तांबोळ या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे हापुस आंबा कलम बागेला भीषण आग लागून सुमारे दीडशे आंबा कलमे आगीमध्ये होरपळून आंबा बागायतदारांचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आंबा कलमांवर तयार झालेला आंबा देखील या आगीमध्ये भाजून गेला आहे.ही आग बुधवारी दुपारी 3.30 वा. सुमारास लागली.
या आगीमध्ये तिर्लोट येथील आंवा बागायतदार भिकाजी उर्फ बबन लिंगायत गुरव यांची सुमारे 100 कलमे तर घाडी कुटूंबीयांची 50 कलमे या आगीत होरपळली. कलम बागेमधून वीज वितरण कंपनीची वीज वाहिनी गेली होती. या वीज वाहिनीला आंबा कलमाच्या फांदीचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच तिर्लोट गावातील ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी वीज वितरण विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वीज वितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. या कलम बागेमध्ये झाडांना आंबे लागलेले होते. आगीमुळे भाजल्याने आंबा बागायतदारांचा हातातोंडाशी आलेला घास ही हिरावला गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा