You are currently viewing 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त परिसंवाद : लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण….

5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त परिसंवाद : लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण….

राज्य निवडणूक आयोगाचे भोसले नॉलेज सिटी येथे आयोजन….

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक, या शिक्षकांप्रति आदर-

प्रेम दर्शवण्यासाठी शाळा-महविद्यालयांतून दरवर्षी ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. भावी पिढीला घडवण्याची, तिला लोकशाही-साक्षर करण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते, हे लक्षात घेऊन यंदा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे *‘लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण’* या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे._
_या परिसंवादामध्ये भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, प्राचार्य शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परिसंवादात जुईली पांगम, मोहम्मद शेख, प्रसाद गावडे, पंकज दळवी हे युवा प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत._
_शिक्षक दिनाच्या या परिसंवादात केवळ औपचारिक शिक्षणावर चर्चा न करता लोकशाही मूल्ये रुजवणारे सर्वांगीण शिक्षण आणि ते शिक्षण देणारे विविध क्षेत्रांतील शिक्षक यांवर ऊहापोह केला जाणार आहे. लोकशाही जीवनप्रणाली म्हणजे काय? सर्व प्रकारच्या शिक्षणव्यवस्थेत आणि दैनंदिन जीवनात लोकशाही मूल्यांचे पालन का आवश्यक आहे? त्यासाठी काय केले पाहिजे? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता इ. सांविधानिक मूल्ये आणि कुटुंब, शिक्षण इ. व्यवस्थांचा परस्परसंबंध या मुद्द्यांची सदर परिसंवादात चर्चा केली जाणार आहे._
_महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी स्टॉल उभारला जाणार आहे. तसेच मतदान, निवडणूक ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे सापशिडी व लुडो हे खेळही आयोजित केले जाणार आहेत. या परिसंवादाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे भारतीय निवडणुकांचा प्रवास आणि युवांना लोकप्रिय असलेल्या मीम्स यांचे प्रदर्शन. भारतीय निवडणुकांचा प्रवास दाखवताना १९५१-५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते ईव्हीएमपर्यंतचा विविध टप्प्यांवरील प्रवास चित्र रूपाने उलगडण्यात येणार आहे. मतदार जागृतीसंबंधी विविध प्रकारची मीम्सही मालवणी बोलीच्या ठसक्यात प्रदर्शित केली जाणार आहेत._
_सदर परिसंवादाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या Chief Electoral Officer, Maharashtra या संकेतस्थळावरून आणि फेसबुक, एक्स (ट्विटर), यूट्युब, इन्स्टा या समाजमाध्यमांवरूनही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सावंतवाडी परिसरातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी परिसंवादाला उपस्थित राहून प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे._

संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा