You are currently viewing वैभववाडी बाजारपेठेत महायुतीची प्रचार फेरी : पत्रकांचे वाटप

वैभववाडी बाजारपेठेत महायुतीची प्रचार फेरी : पत्रकांचे वाटप

वैभववाडी बाजारपेठेत महायुतीची प्रचार फेरी : पत्रकांचे वाटप

भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी

वैभववाडी

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी बाजारपेठेत प्रचार फेरी काढण्यात आली. या रॅलीत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचा शुभारंभ भाजपा कार्यालय येथून करण्यात आला. अब की बार.. चारशे पार. हर हर मोदी. नारायण राणे आगे बढो..अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शहरातील व्यापारी, फिरते व्यापारी व नागरिक यांना रॅलीतील कार्यकर्त्यांनी पत्रकाचे वाटप केले. बुधवार आठवडा बाजारात आलेल्या सर्व ग्राहक व प्रवाशांना पत्रकाचे वाटप करण्यात आले. या रॅलीत वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी रावराणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख पदाधिकारी सचिन तावडे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईंणकर, अरविंद रावराणे, प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, गुलाबराव चव्हाण, भालचंद्र साठे, सज्जन काका रावराणे, माजी सभापती, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सरपंच, आजी-माजी सभापती, भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा