You are currently viewing अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात रंगला ‘व्हीजे’स डान्स अॅण्ड आर्ट स्टुडिओ’चा ९वा वर्धापन सोहळा

अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात रंगला ‘व्हीजे’स डान्स अॅण्ड आर्ट स्टुडिओ’चा ९वा वर्धापन सोहळा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

नृत्याची आवड असणारा काळाचौकी मधील एक युवक विकी जयस्वाल ज्याला नृत्य प्रशिक्षणासाठी बिकट आर्थिक परिस्थितीतून जावे लागत होते आणि त्याच्याप्रमाणेच अनेक लोक असतील, अशी भावना घेऊन ज्यांना नृत्याची आवड आहे अशा विद्यार्थ्यांना माफक दरात नृत्याचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली. नृत्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशातून ‘व्हीजे’स डान्स अँड आर्ट स्टुडिओ’ची स्थापना २० जुलै २०१४ रोजी करण्यात आली होती. त्याचसोबत त्यांचे जवळचे मित्र आणि सहकारी प्रविण कदम, अतुल खंडागळे, प्रितेश नल्ला आणि कादंबरी वाजे यांनी सुद्धा सुरुवातीच्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत नृत्य प्रशिक्षक म्हणून त्यांची भूमिका बजावली आहे.

व्हीजे’स डान्स अँड आर्ट स्टुडिओतर्फे ९वा वर्धापन सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा येथे आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील वच्छी हे पात्र रंगवणार्‍या तसेच सध्या रंगभूमीवर जम बसवलेल्या ‘रियुनियन’ या नाटकाच्या गुणी अभिनेत्री संजीवनी पाटील तसेच तेजस्विनी सुनील उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचं समयोचित सूत्रसंचालन अभिनेते सागर सातपुते यांनी केले. विविध नृत्यशैलींचे समूह नृत्याविष्कार आजच्या कार्यक्रमात सादर करण्यात आले.

दरम्यान कार्यक्रमासाठी समाजातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून ‘व्हीजे’स डान्स अँड आर्ट स्टुडिओ’चे संस्थापक विकी जयस्वाल आणि संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या. त्यात आजवर १०० वेळा रक्तदान केलेले डॉ. प्रागजी वाजा, यूवा उद्योजक उदय पवार, समाजसेवक महेंद्र सातपुते, पोलीस रमेश उथले, सुधीर उठले, भरत शिंदे, राज क्लासेसचे सर्वेसर्वा राज औटी, पारिजात मुंबईचे गुरुदास बाटे, स्वप्नील पाथरे, युवासेना विभाग अधिकारी सुप्रित म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्हीजे’स डान्स अँड आर्ट स्टुडिओच्या विकी जयस्वाल यांच्यासह प्रितेश नाल्ला, प्रवीण कदम, अतुल खंडागळे, कादंबरी वाझे, सेजल स्वभावने, विष्णू पासवान, पोर्णिमा सोनवणे सर्व शिक्षकांनी अपार मेहनत घेतली.

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा