You are currently viewing शेर्पे घरफोडी प्रकरणात दोघांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी…

शेर्पे घरफोडी प्रकरणात दोघांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी…

शेर्पे घरफोडी प्रकरणात दोघांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी…

कणकवली:

तालुक्यातील शेर्पे-मुस्लिमवाडी येथील शरफुद्दीन अब्दुल लतिफ जैतापकर यांचे बंद घर फोंडून कपाटातील ८ हजार ५०० रुपये लंपास करणारे संशयित चोरटे धीरज यशवंत जाधव ( वय २९ ) व राकेश यशवंत जाधव ( वय २६ ) दोन्ही रा. कुरंगवणे-बौद्धवाडी या सख्ख्या भावांना कणकवली पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये जेरबंद केले. याकामी पोलिसांना श्‍वानपथकाचेही विशेष सहकार्य लाभले. या दोन्ही संशयितांनी चोरी केल्याचे सोमवारी सायंकाळी साडे सहा च्या सुमारास उघड झाल्यानंतर रात्री ११ वाजता त्यांना अटक करण्यात आली.

चोरट्यांना अटक करण्यामध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्यासह खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे तसेच श्‍वानपथकाचे अमित वेंगुर्लेकर व अन्य कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. विशेषत: ‘रॅम्बो’ या श्‍वानमुळे चोरटे सापडू शकले. चोरटे तळेरे बसस्थानकातून एसटीतून मुंबईकडे जात असतान पोलिसांनी त्यांना एसटीतून अटक केली. धीरज जाधव याच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. धीरज व राकेश हे मुंबईत कामाला असून ते दोघे गावी येऊन चोरी करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांनी दिली. दरम्यान या दोन्ही आरोपींना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

प्रतिक्रिया व्यक्त करा