You are currently viewing मोह आवर माणसा…

मोह आवर माणसा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

मोह आवर माणसा…

 

वसुंधरा…..

माती ,पाणी झाडं,नद्या,डोंगर ,खनिजाने समृद्ध वसुंधरा…

.हो..मी पाहिली आहे अशी वसुंधरा…

खळखळत वाहणाऱ्या ..नद्या

हिरवीगार राने,पक्षी थव्याने…

पाहिली अशी वसुंधरा….

पण आताचं बदलतं रूप तिचं..

बघता बघता पालटलं…

जिने ओटीत दान टाकलं…

तिचंच सारं ओरबाडलं..

मानवा …कां रे असं केलंस…

तुझ्यासाठी सजली..पाऊस ऊन सोसलं..वा-यावादळात झुंजली

तुझ्यासाठी लढली..आणि देतच राहिली भरभरून तुला….

वसुंधरा…

तू काय केलंस?

अवास्तव धरणं बांधली …पाणी अडवलं..प्रवाह विध्द केलेस…

लालसेपोटी पहाड फोडून

विद्रूप केलेस…

सावली देणारी हिरवी झाडं

तोडलीआणि रहायला सिमेंटची जंगलं निर्माण केली.प्राण्यांचा

अधिवास गेला…पक्षांची घरटी गेली…काय मिळवलंस तू यातून…

सौंदर्य घालवलं वसुंधरेचं….

अवकळा आणलीस तिला….

ती मूक रूदन करते ..ऐक तिची हाक….जाग आतातरी….

प्राणवायू हवाय जगण्यासाठी..

तो तिच्याशिवाय कसा मिळेल…

जागृत हो मानवा….

पुढील पिढ्या स्वस्थ ठेवायच्या

तर पुन्हा झाडे लाव….

जंगल वाचवं…वसुंधरेला पुनरुज्जीवन दे….

क्षमा करेल ती आपल्याला….

पुन्हा देईल भरभरून सारे….

पण आता मोह आवर रे

मोह आवर रे…….

सांगतेय वसुंधरा…

आपली वसुंधरा…..!

🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा