कणकवली :
कणकवली तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकी साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर तारीख ही अंतिम आहे. त्यात सुट्टीचे दिवस आल्याने अठ्ठावीस ते तीस डिसेंबर पर्यंत अवघे तीन दिवस इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहीले आहेत. अद्यापपर्यंत तालुक्यात एकही अर्ज दाखल झाला नसल्याने या तीन दिवसांमध्ये इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
कणकवलीच्या तालुक्यातील भिरवंडे गांधीनगर तोंडोली – बावशी या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहे. या तीन ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन फॉर्म भरण्यास तेवीस नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या २ दिवसांत तिन्ही ग्रामपंचायती साठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. यात काही नामनिर्देशन अर्जामध्ये चुका होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगामार्फत वेगवेगळ्या पध्दतीने मार्गदर्शन केले आहे. इच्छुकांनी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने शेवटच्या दिवसांत गर्दी होणार असल्याने अनेकांना चुका झाल्यास फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून ऑफलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.