You are currently viewing गावोगावी जाऊन निवडणुक प्रचारासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या साठी व्हॅनिटी व्हॅन तैनात

गावोगावी जाऊन निवडणुक प्रचारासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या साठी व्हॅनिटी व्हॅन तैनात

गावोगावी जाऊन निवडणुक प्रचारासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या साठी व्हॅनिटी व्हॅन तैनात

सावंतवाडी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या दिमतीला एक व्हॅनिटी व्हॅन तैनात करण्यात आली आहे. ते या व्हॅन मधून गावोगावी जाऊन प्रचार करणार आहेत.

लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारात नेते हिरीरीने सहभाग घेत आहेत. प्रचारासाठी व्हॅनिटी व्हॅन चा वापर करण्याचे केसरकर यांनी जाहीर केले होते. ती व्हॅन त्यांच्या दिमतीला दाखल झाली आहे. सर्व सोयीसुविधा असलेली ही व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅन मध्ये आठ व्यक्ती बसण्याची क्षमता आहे. गावोगावी प्रचार करताना वेळेचे बंधन लक्षात घेऊन या व्हॅन मध्येच मुक्कामही करता येईल.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी केसरकर या व्हॅन मधून गावोगावी पोहोचणार आहेत .या आलिशान व्हॅन मधून सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात राणे यांच्या प्रचारात उतरले आहेत. या व्हॅन मध्ये कॉन्फरन्स बैठक व्यवस्थाही आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा