उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध पथकांमार्फत महसुल वसुली
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विविध पथकामार्फत तसेच इन्सुली येथील सीमा तपासणी नाक्यामार्फत पुढीलप्रमाणे महसुल वसुली केलेला असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे.
सन 2023 -24 मधील जमा महसुलाचा आढाव (रु. लाखात )
तपशील |
रक्कम |
वार्षिक लक्षांक |
69.23 |
वार्षिक पुर्तता |
57.67 |
टक्केवारी |
83.30 |
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देण्यात आलेल्या उद्दीष्टापैकी 83.30 टक्के इतकी महसुल वसुली झालेली आहे.
वायुवेग पथकाच्या कामगिरीचा आढावा
तपशील |
सिंधुदुर्ग |
वार्षिक लक्षांक (तडजोड शुल्क ) |
125 |
वार्षिक पुर्तता |
135.01 |
टक्केवारी |
108 |
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वायुवेग पथकास देण्यात आलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्तीचे म्हणजेच 108 टक्के
इतकी महसुल वसुली झालेली आहे.
सीमा तपासणी नाक्यांवरील कामगिरीचा आढावा (रु. लाखात)
तपशील |
तडजोड शुल्क |
वार्षिक लक्षांक |
200.00 |
वार्षिक पुर्तता |
198.72 |
टक्केवारी |
99 |
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सीमा तपासणी नाका, इन्सुलीकरीता देण्यात आलेल्या उद्दीष्टापैकी 99 टक्के इतकी महसुल वसुली झालेली आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एकुण 2002 वाहनांना आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात आले असून त्याव्दारे 1.45 कोटी इतकी महसुल वसुली झालेली असल्याचेही श्री. काळे यांनी कळविले आहे.