You are currently viewing आचरा पिरावाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती शताब्दी महोत्सव…

आचरा पिरावाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती शताब्दी महोत्सव…

आचरा पिरावाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती शताब्दी महोत्सव…

श्री तरुण संघ दक्षिणवाडा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

मालवण

आचरा पिरावाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव सोहळा दि. २१ ते २३ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त श्री तरुण संघ दक्षिणवाडा यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

यानिमित्त दि. २१ एप्रिल रोजी सकाळी ९. वा. श्री हनुमान मुर्तीवर अभिषेक, सकाळी ९.३० वा. सभामंडपाचे उद्घाटन, सकाळी १० वा.श्री कृष्ण मंदिर (दक्षिणवाडा) येथे श्री सत्यनारायण महापुजा, आरती व तिर्थप्रसाद सकाळी १०.४५ वा. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा (आचरा मर्यादित), दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, रात्री ९.०० वा. श्री हनुमान जयंती शताब्दी सोहळा उद्घाटन होणार असून त्यास उद्घाटक सौ. मधुमती एम. निकम (सह धर्मदाय आयुक्त ओरोस सिंधुदुर्ग), अध्यक्ष म्हणून सचिन वि. कुबल (अध्यक्ष ग्रामस्थ सभा मुंबई), प्रमुख उपस्थिती श्री. मिलींद मिराशी (अध्यक्ष श्री देव रामेश्वर संस्थान आचरे), सुनिल जाधव (पोलिस उपनिरिक्षक आचरा), अॅड. अक्षय शशिकांत सामंत, अशोक सारंग (सीए), नारायण वि. कुबल (अध्यक्ष ग्रा. मं.-पिरावाडी), अशोक कांबळी (अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ आचरा), प्रमोद वि. कोळंबकर (चेअरमन रा. वि. पिरावाडी), रणजीत बुगडे (मुख्या. रा. विद्या. आचरे-पिरावाडी), सुभाष तु. चुरी, दीनानाथ म. धुरी (अध्यक्ष तरुण संघ दक्षिणवाडा) आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री ९.१० वा. ते १०.३० वा. श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव स्मरणिका प्रकाशन, वार्षिक पारितोषिक आणि शिष्यवृत्ती वितरण, मान्यवरांचा सत्कार व मान्यवरांचे शुभेच्छा संदेश, स्थानिक व मुंबईकरांकडून करमणूकीचे कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. ते १०.३० वा. शालेय मुलांसाठी मनोरंजक खेळांच्या स्पर्धा, सकाळी १० ते ११.३० वा. दत्ताराम भाऊ कोयंडे शाळागृहातील मुलांचा गुणगौरव समारंभ होणार आहे. त्यास प्रकाश पेडणेकर (मुख्या.- वायंगणी हायस्कूल), सुरेश ठाकूर (अध्यक्ष-को. म. सा. परिषद), नित्यानंद तळवाडकर (अध्यक्ष- शा. स., हु.द. भा. कोयंडे विद्यामंदिर), सुभाष नाटेकर (मुख्या. हु. द. भा. कोयंडे विद्यामंदिर), मुरलीधर सु. कोळंबकर – (उपाध्यक्ष तरुण संघ दक्षिणवाडा ), संध्याकाळी ३ ते ६ वा. महिलांसाठी स्पर्धा, संध्याकाळी ७ वा. श्रीं ची आरती व भव्य पालखी मिरवणूक, रात्री १० वा. सत्कार सोहळा, रात्री १०.३० वा. “संस्कृति कला संवर्धन मुंबई प्रस्तुत नृत्य आणि अभिनयाचा कलाविष्कार कलारंग” यांचा करमणूकीचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. पोथी वाचन, सकाळी ६.१८ वा. श्री हनुमान जन्म, आरती व तिर्थ प्रसाद, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापुजा, आरती व तिर्थप्रसाद, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद सायंकाळी ४ वा. महिलांचा हळदीकुंकू समारंभ, रात्री ९ वा. “श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव सोहळा सांगता समारंभ” होणार आहे. त्यास अध्यक्ष म्हणून चंद्रकांत ग. कुबल (सेवानिवृत्त लेखा परिक्षक), शरद दि. पुरी (अध्यक्ष ग्रामस्थ सभा मधला वाडा पिरावाडी), अनिल करंजे (अध्यक्ष, राधाकृष्ण देवस्थान, कृष्णनगर), दिनकर वि. कुबल (अध्यक्ष, श्री. विठ्ठल समाज वि. मं. उत्तरवाडा), प्रकाश गो. तोडणकर (अध्यक्ष का. आ.नि. समिती मुंबई), गणेश हरिश्चंद्र मित्र, दीनानाथ म. धुरी (अध्यक्ष तरुण संघ दक्षिणवाडा) आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री ९.३० वा. राजयोग धुरी व प्रीती कुबल यांचा विशेष सत्कार, रात्री १० वा. बुवा विनोद चव्हाण व बुवा विजय उर्फ गुंडू सावंत यांच्यात डबलबारी भजन सामना होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री तरुण संघ दक्षिणवाडा आचरा पिरावाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + nine =