You are currently viewing सावंतवाडी येथील प्रथितयश व्यापारी अशोक गुप्ता यांचे निधन…

सावंतवाडी येथील प्रथितयश व्यापारी अशोक गुप्ता यांचे निधन…

सावंतवाडी येथील प्रथितयश व्यापारी अशोक गुप्ता यांचे निधन…

सावंतवाडी

रो अशोक गुप्ता यांचे आज सकाळी 9.30 वाजता निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 69 होते. मूळचे दिल्ली येथील ते होते . व्यापारासाठी ते 50वर्षा पूर्वी सावंतवाडीत आले व ते कायमचे सावंतवाडीचे झाले.स्टेशनरी व कटलरी व्यापारात सिंधुदुर्ग रत्नागिरी व गोवा विभागात ते नंबर वन म्हणून नावाजले जायचे. शांत स्वभाव.गोड बोलणे ,दुसऱ्याची गरज ओळखून उदारी माल देऊन मदत करण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक व्यापरीना त्यांनी मदत करून मोठे केले आहे. अनेक संस्थान वर त्यांचा सहभाग असायचा. उभा बाझार गणेश उत्सव,त्यांच्या व त्यांच्या मित्र मंडळी कडून फार उत्तम प्रकारे होतो, भटवाडी येथे देवी उत्सव उत्तम प्रकारे साजरा होतो.रोटरी क्लब सावंतवाडी चे 1992-१९९३ चे ते प्रेसिडेंट होते. Nab सावंतवाडीचे ते संचालक होते. सर्वांच्यात हसतमुख राहून गोडबोळून समोरच्या माणसाला आपल करण त्यांना आवडत असे. त्यांच्या मागे एक मुलगा सून नातू तीन मुली जावई.असा मोठा परिवार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा