You are currently viewing संशयितांची नावं पोलिसांकडे, तरीही तपास शून्य

संशयितांची नावं पोलिसांकडे, तरीही तपास शून्य

*रंगेहाथ पकडलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी सोडले होते समज देऊन*

 

*न्हावेली मंदिरातील फंडपेटी चोरी*

 

सावंतवाडी :

 

न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील श्री माऊली मंदिरातील फंडपेटी चोरी च्या तपासाकडे सावंतवाडी पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने,ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमितीने संशयितांची नावेही दिली आहेत. एका संशयिताला त्याच मंदिरातील फंडपेटी फोडताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या घटनेनंतर पोलीस पाटील चतुर मालवणकर यांच्या उपस्थितीत मंदिरात ग्रामस्थांनी समज देऊन सोडण्यात आले होते. नातेवाईकांनी पोलिसांच्या ताब्यात द्या, असे सांगितले होते. काही ग्रामस्थांनी समज देऊन सोडून दिल्याने, गावातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 3 =