You are currently viewing _YBIT घेऊन येत आहे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची संधी…._

_YBIT घेऊन येत आहे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची संधी…._

*_YBIT घेऊन येत आहे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची संधी…._*

_*जर्मन शिष्टमंडळाच्या माहितीसत्रात भाग घेण्यासाठी आजच नावनोंदणी करा….*_

_सावंतवाडी –

येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जर्मनीतील नोकरीच्या संधी या विषयावर 22 एप्रिल 2024 रोजी स.10 वा. माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन व जर्मनीतील बॅडेन वॉटेनबर्ग या राज्यात तंत्रकुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार झाला असून त्याकरिता जिल्ह्यातील सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून YBIT अर्थात यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ची निवड करण्यात आली आहे._
_या अनुषंगाने प्राथमिक चाचपणी व पहिले माहिती सत्र 5 एप्रिल रोजी पार पडले होते. आता दुसऱ्या टप्प्यात 22 एप्रिल रोजी थेट जर्मनी येथून सहा कंपन्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत._
_महाराष्ट्र शासन व जर्मन राज्य सरकारच्या वतीने तीन महिने अल्पमुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम भोसले नॉलेज सिटी येथे येणाऱ्या उन्हाळी सुट्टीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये जर्मन भाषा, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट ई. विषयांचा अंतर्भाव असेल. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना जर्मनीस्थित कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाणार आहे._
_माहिती सत्रात सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थी हे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व मेकॅट्रॉनिक्स या विषयातून डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण झालेले असावेत. तसेच आयटीआय मधून इलेक्ट्रिशिअन, डिझेल मेकॅनिक ई.अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थीसुद्धा याकरिता पात्र आहेत._
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या माहिती सत्रासाठी नोंदणी करावी व जर्मनीसारख्या प्रगत देशात नोकरी मिळण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन YBIT प्राचार्य डॉ. रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 9405099968 या क्रमांकावर नावनोंदणीसाठी संपर्क साधावा_

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =