You are currently viewing इस्कॉन सावंतवाडी येथे रामनवमी सोहळा उत्साहात साजरा…

इस्कॉन सावंतवाडी येथे रामनवमी सोहळा उत्साहात साजरा…

इस्कॉन सावंतवाडी येथे रामनवमी सोहळा उत्साहात साजरा…

सावंतवाडी

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी च्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित रामनवमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
सोमवार ते आज बुधवार तीन दिवस रामकथेचे आयोजन करण्यात आले होते .आज सकाळी १० वाजता भजन, कीर्तन, रामकथा ,१ वाजता आरती,व नंतर महाप्रसाद देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब, सावंतवाडीचे युवराज लखमराजे यांनी इस्कॉन सावंतवाडी सेंटर येथे भेट देऊन कार्यक्रमात सहभाग दर्शवला.
दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरे कृष्ण भक्तांनी प्रयत्न केले.पुण्याचे श्रीमान कृष्ण नाम प्रभुजी यांनी रामायणातील प्रसंग वरुन आदर्श राजा,आदर्श पिता, आदर्श पती, म्हणून प्रभु रामचंद्र यांची ख्याती जगभर आहे,व भरताची भक्ती, भरत मीलनातुन आपण बंधुप्रेम, कौटुंबिक संबंध व राज्य कारभार कसा करावा याची शिकवण मिळते असे सांगितले कथेचा सर्वांनी लाभ घेतला. इस्काॅन सावंतवाडी च्या वतीने कृष्ण नाम प्रभुजी व आलेल्या भाविकांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा