You are currently viewing इंडियाची निराशाजनक सुरुवात…

इंडियाची निराशाजनक सुरुवात…

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशानेने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडने 38 धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. फिरकीपटू रवींचंद्रन अश्विनने 3 खेळाडूंना बाद केलं. मोहम्मद सिराजने 2 विकेट्स मिळवल्या.  तर रवींद्र जाडेजाने 1 विकेट मिळवला.

 

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना सुरुवातीपासून ठराविक अंतराने धक्के दिले. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना टिकता आले नाही. ट्रॅव्हिल हेड आणि मार्नस लाबुशानेने मैदानात घट्ट पाय रोवले होते. हे दोघे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होते. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच टीम इंडियाच्या खेळाडूंनीही चांगल्या कॅचेस घेतल्या.

 

दरम्यान टीम इंडिया पहिल्या डावात कशाप्रकारे फलंदाजी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

टीम इंडियाचे अंतिम 11 खेळाडू : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

 

ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 खेळाडू : टीम पेन (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), जो बर्न्स, मारनस लबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नॅथन लॉयन आणि जोश हेझलवूड

प्रतिक्रिया व्यक्त करा