*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
*श्री गजानन विजय ग्रंथ*
अध्याय सोळावा
अकोल्याचा राजाराम
सराफीचा सावकार
पुत्र त्र्यंबक धाकला
मनी भावभक्ती फार ||
“भाऊ” टोपण नांव हो
असे त्र्यंबकाचे जाणा
गुरू गजानन त्याचा
असे शेगांवीचा राणा ||
योगीराज गजानन
असे भाऊचे दैवत
कांदा पिठले भाकरी
नैवेद्याचे मनोरथ ||
घरी भाऊची वहिनी
नाम जिचे असे नानी
भाऊ निघाले गाडीने
चून भाकरी घेऊनी ||
गाडी चुकली भाऊची
अश्रु दाटले लोचनी
गुरूसेवा न घडली
खिन्न झाला मनोमनी ||
उपोषित रहाण्याचा
केला निर्धार मनासी
आले तिहीच्या गाडीने
धांवे गुरूचरणासी ||
घांस भाजी भाकरीचा
गुरू घेई आनंदाने
भक्ती फळली भाऊची
मुख फुलले हर्षाने ||
महाराजांसाठी सारे
भक्त हे समसमान
हयाचे सोळावा अध्याय
असे ग्रंथात प्रमाण ||
©️®️
सौ.मंजिरी अनसिंगकर
नागपूर.