You are currently viewing महामार्गावर जाणवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

महामार्गावर जाणवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

महामार्गावर जाणवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली पिकअप शेड नजीक सायंकाळी ५:४५ वा. च्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात झाला. या अपघातात आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. तर धडक देणारा वाहन चालक अपघात होताच घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान उपचार सुरू असताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

मंगला रामचंद्र जाधव ( वय ७० रा. जाणवली ) या देवगड येथे आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. देवगड येथून आल्यावर त्या जाणवली बस थांब्यावर उतरल्या. तेथून त्यांचा मुलगा शरदचंद्र रामचंद्र जाधव ( रा. जाणवली वय. ४७ ) हा नेण्यासाठी आला. तेथूनच रस्ता ओलांडत असताना मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात कारने धडक दिली. यामध्ये मुलगा शरदचंद्र जाधव व आई मंगला जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले.

जखमी मंगला जाधव व शरदचंद्र जाधव यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याने उपचारासाठी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शरदचंद्र जाधव ( रा. जाणवली वय. ४७ ) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, कॉन्स्टेबल मारुती बारड, स्मिता माने, कॉन्स्टेबल मनोज गुरव, कॉन्स्टेबल आर. के. पाटील, किरण कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सायंकाळी उशिरा पर्यंत अपघाताची माहिती नोंदविण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा