You are currently viewing कोलगाव येथील निबंध स्पधेत स्वप्नाली राऊळ, वृद्धी राणे प्रथम

कोलगाव येथील निबंध स्पधेत स्वप्नाली राऊळ, वृद्धी राणे प्रथम

कोलगाव येथील निबंध स्पर्धेत स्वप्नाली राऊळ, वृद्धी राणे प्रथम

सावंतवाडी : कोलगाव येथील भिमाई महिला स्वयंसहाय्यता समूह व सांस्कृतिक व शैक्षणिक उत्कर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बालगटातून प्रथम स्वप्नाली राऊळ तर मोठ्यागटातून वृद्धी राणे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये लेखन व वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने भिमाई महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या नूतन अध्यक्षा श्रीम. सान्वी जाधव यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक, शैक्षणिक उत्कर्ष समितीच्या सहकार्याने कोलगाव मर्यादित ग्रामस्तरीय निबंध स्पर्धां राबविण्यात आल्या. यावेळी विचारमंचावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या कोलगाव क्लस्टरचे प्रमुख अभय भिडे, अद्विक बिझनेस हबचे संचालक संजोग जाधव, अंगणवाडी सेविका पर्णिका कांबळे आदी उपस्थित होते. निबंध स्पर्धेत ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. निबंध स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे

बाल गट :
१) प्रथम : स्वप्नाली भिकाजी राऊळ इयत्ता चौथी – शाळा नं. ३
२) द्वितीय : सृष्टी संतोष लांबर इयत्ता तिसरी – शाळा नं. ४
३) तृतीय : नील रामदास पिकुळकर इयत्ता तिसरी – शाळा नं. ४
४) उत्तेजनार्थ : सम्यक संतोष जाधव इयत्ता तिसरी – शाळा नं. १
५) उत्तेजनार्थ : गायत्री गुरुनाथ घाडी इयत्ता दुसरी – शाळा नं. ५
मोठागट :
१) प्रथम : वृद्धी मनोज राणे इयत्ता पाचवी – शाळा नं. ५
२) द्वितीय : सानिया बाबुराव कदम इयत्ता सातवी – शाळा नं १
३) तृतीय : तनिष्का सोनू कदम इयत्ता सातवी – शाळा नं. १
४) उत्तेजनार्थ : गौरी बापू परब इयत्ता पाचवी – शाळा नं. १
५) उत्तेजनार्थ : गणेश शंकर बागवे इयत्ता पाचवी – शाळा नं. १
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुनाथ जाधव, रविराज जाधव, मयूर जाधव, शंकर जाधव, अनिकेत कदम, अभिमन्यू कदम, रवी जाधव, सुमित जाधव, तेजस जाधव, संकेत जाधव, मानसी जाधव, श्रीम. ममता जाधव, श्रीम. अश्विनी जाधव, श्रीम. सुशीला गोड्याळकर, श्रीम. रुद्रांगी जाधव, श्रीम. छाया जाधव, श्रीम. प्रांजल जाधव, श्रीम. पार्वती जाधव, अंगणवाडी सेविका पर्णिका कांबळे, मदतनीस श्रीम. दळवी, श्रीम. ममता कदम आदींचे सहकार्य लाभले.

*संवाद मिडिया*

*👉पाहिजेत…पाहिजेत…पाहिजेत….!*🏃‍♀️🏃

👚👖👕👖👔👖🎽👖👚👖👕👖👚

*Cottonking व TYZER शोरूममध्ये कामासाठी होतकरू मुलं पाहिजेत !🏃‍♀️🏃*

*नोकरीची सुवर्णसंधी, स्थानिकांना प्राधान्य!*👨‍⚖

*💸आकर्षक पगार*

*📍पत्ता : कॉटनकिंग व टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*

*संपर्क : 📲9881234047*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131989/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा