You are currently viewing अटल प्रतिष्ठानच्या शिशुवाटिकेचा वर्षात समारंभ भावुक वातावरणात संपन्न

अटल प्रतिष्ठानच्या शिशुवाटिकेचा वर्षात समारंभ भावुक वातावरणात संपन्न

 

अटल प्रतिष्ठान सातत्याने गेली एकोणीस वर्षे शिशुवाटिकेच्या माध्यमातून संस्कारक्षम शिशुशिक्षणाचा उपक्रम राबवत आहे. यावर्षी इयत्ता पहिलीत जाणाऱ्या पंधरा मुलांना निरोप देण्यासाठी वर्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राणी पार्वतीदेवी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जगदीश धोंड यांनी अटल प्रतिष्ठानने विद्या भारतीच्या अभ्यासक्रमावर आधारित या जिल्ह्यात संस्काराचं एक चालत बोलत विद्यापीठ चालवलेल असून या उपक्रमात तळमळीने काम करणाऱ्या शिशुवाटिकेच्या दिदि या प्रशिक्षीत असल्याने बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणात लहान मुलांची मानसिक जडणघडण योग्य दिशेने करण्यासाठी प्रयत्नशील असतात हे कौतुकास्पद आहे.

अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ राजशेखर कार्लेकर यांनी आपल्या प्रास्ताविक संबोधनात शिशुंच्या मानसिक व शारीरिक क्षमता वृध्दींगत करण्यासाठी पालकांनी सजग रहाण्याबाबत मार्गदर्शन केले. वर्षेभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा शिशुवाटिकेच्या दिदी सौ. रसिका भराडी यांनी घेतला तर प्रधानाचार्या श्रीमती विजया रामाणे यांनी पालकांनी गेली तीन वर्षे जे सहकार्य केल यासाठी पालकांचे आभार मानले.

या निरोप समारंभात पालक आणि मुलं सगळेच भाऊकं झाले होते. साडेपाच वर्षाची पहिलीत जाणारी अवनी घाटे ही मुलगी आपल्या भावना व्यक्त करताना “मला या शाळेतून जाताना फारचं वाईट वाटतं” असं म्हणून रडायला लागली तेव्हा या कार्यक्रमासाठी उपस्थित शंभरहून जास्त पालकांना अश्रू अनावर झाले. यावेळी पालकांच्या वतीने सौ. मानसी घाटे, सौ. रुपा कामत प्रसाद गावडे, श्री सिध्देश कानसे व इतर पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिशुवाटिकेच्या दिदिंचे विशेष कौतुक केले. ही सर्व मंडळी यावेळी फार भावनाविवश झालेली होती.

यावेळी सर्व मुलांचे औक्षण करून त्याना श्री विकास गोवेकर यांनी लिहिलेलं सुलेखनाची पुस्तके भेट देण्यात आली तसेच पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्यानां प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

आपल्या समारोपाच्या भाषणात अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड नकुल पार्सेकर यांनी या सगळ्या प्रवासात अविरतपणे काम करणाऱ्या दिदि, पालक, देणगीदार, हितचिंतक आणि आमच्या समाजाभिमुख उपक्रमानां सदैव सहकार्य करणारे पञकार यांचे आभार मानले. सुञसंचालन सौ. धनश्री देऊसकर यांनी केले. यावेळी शिशुवाटिकेच्या व्यवस्थापिका डॉ. सौ. रश्मी कार्लेकर, दिदि सौ. परब, सौ. सायली सरमळकर, श्रीमती मानसी मोरजकर, पालक समितीच्या अध्यक्षा सौ. मिरा गिरप, पालक समितीचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 4 =