You are currently viewing कणकवलीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

कणकवलीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

कणकवलीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

संजीवनी व अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा पुढाकार; तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी…

कणकवली

संजीवनी हॉस्पिटल कणकवली आणि अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात हृदयविकार, हाडाचे विकार, गुडघे लिंगामेंट, कॅन्सर विकार, मुतखडा व प्रोस्टेट यांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी उद्या सकाळी संजीवनी हॉस्पिटल येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा