You are currently viewing कणकवली-ओटव धरणात १४ वर्षीय मुलगा बुडाला…

कणकवली-ओटव धरणात १४ वर्षीय मुलगा बुडाला…

गुरुवारी सायंकाळची घटना; शोध मोहीम सुरु…

कणकवली

तालुक्यात ओटव येथे असलेल्या धरणात मुंबईहून आलेला एक १४ वर्षीय मुलगा बुडाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेनंतर ओटव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित मुलगा बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलांनी देखील तलावात उडी घेतली. पण दुर्दैवाने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. रात्री उशिरापर्यंत राबविण्यात आलेली शोधमोहीम अपयशी ठरली. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळपासून ही शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच ओटव सरपंच हेमंत परुळेकर यांच्यासह कणकवली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हडाळ व पोलिस घटनास्थळी गुरुवारी सायंकाळी दाखल झाले होते. मात्र सायंकाळच्या सत्रात ही घटना घडल्याने त्यातच सायंकाळपासून पाऊस सुरू झाल्यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते. दरम्यान आज सकाळी पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले हे घटनास्थळी दाखल झाले असून या बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू करण्यात आला आहे. हा तरुण आपल्या कुटुंबियांसह मुंबईहून आपल्या शेजारी असलेल्या एका कार्यक्रमानिमित्त गावी आला होता. सायंकाळच्या सुमारास ओटव धरणाच्या परिसरात गेला

प्रतिक्रिया व्यक्त करा