भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे पदाधिकारी सहभागी
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला वेंगुर्ले तालुक्यातुन मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार
वेंगुर्ला :
वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी कार्यालयात वेंगुर्ला तालुक्याची महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हजर होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनिष दळवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना तालुका प्रमुख नितिन मांजरेकर, जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे , राष्ट्रवादिचे मकरंद परब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दाजी पेडणेकर ,ता.संघटक बाळा दळवी , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर ,सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण उर्फ राजू परब , ता.उपाध्यक्ष प्रितेश राऊळ व लक्ष्मीकांत कर्पे , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , किसान मोर्चाचे विजय रेडकर, जिल्हा उपाध्यक्ष निलेश सामंत ,मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर , शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम , ता.चिटणीस समीर कुडाळकर, मारुती दोनशानटी ,अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, रविंद्र शिरसाठ , सुरेश धुरी,शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष केळजी, पुंडलिक हळदणकर, मा.उपनगराध्यक्ष दाजी परब , युवा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, उपस्थित होते, वेंगुर्ला तालुक्यातील पाच जिल्हापरिषद मतदार संघामध्ये प्रमूख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवारास मोठ्या मताधिक्याने निवडून आणन्याचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एक दिलाने प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस बाळू देसाई, मनिष दळवी, सचिन वालावलकर, मकरंद परब, पेडणेकर यांनी त्या त्या जिल्हा परिषद भागात समिती गठीत करून पुढील कामकाजाची दिशा तालुका आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून सूचना येतील त्याप्रमाणे करण्याचे ठरविण्यात आले.