You are currently viewing पिंगुळीत सामाजिक कार्यकर्त्यांकडून गाईच्या जखमी वासरावर उपचार… 

पिंगुळीत सामाजिक कार्यकर्त्यांकडून गाईच्या जखमी वासरावर उपचार… 

पिंगुळीत सामाजिक कार्यकर्त्यांकडून गाईच्या जखमी वासरावर उपचार…

कुडाळ

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील स्वामी समर्थ गॅरेजच्या मागे गाईचे एक वासरू जखमी अवस्थेत असल्याचे गॅरेजचे मालक बबलू पिंगुळकर, राजन सडवेलकर यांना आढळून आले. याबाबतची माहिती त्यांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक गावडे यांना फोन करून दिली.

दीपक गावडे यांनी वेळ न घालविता सर्पमित्र अनिल गावडे, पशूवैद्यकीय डॉ. प्रभाकर दाभाडे, विघ्नेश धोंड यांना घटनास्थळी बोलावून गाईच्या वासरावर औषधोपचार करून त्याला मूळ मालकाच्या ताब्यात दिले. यावेळी डॉ. प्रभाकर दाभाडे, सामजिक कार्यकर्ते दीपक गावडे, सर्पमित्र अनिल गावडे, तंटामुक्त अध्यक्ष राघोबा धुरी, बबलु पिंगुळकर, राजन सडवेलकर, गणपत सामंत, डॉ. विघ्नेश धोंड आदींनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा