निवडणूक काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे…
जिल्हाधिकारी किशोर तावडे; कुडाळ येथील बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना…
कुडाळ
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करत असताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे. कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान प्रक्रिये बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपविभागीय अधिकारी कुडाळ तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, मालवण तहसीलदार आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. तावडे म्हणाले की, क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांमधील दुवा म्हणून कामकाज आणि भूमिका पार पाडावी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना वाहन व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे त्याच वाहन व्यवस्थेतून निवडणूक विषयक कामकाज पार पाडण्याबाबत यावे तसेच निवडणूक कामकाजामध्ये काम करीत असताना सर्वांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी पार पाडावी, क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्र यांना समक्ष भेटी देऊन सर्व सुविधा सुस्थितीत असल्याबाबतची पुन्हा एकदा खात्री करणेबाबत सूचना करण्यात आल्या.
निवडणूक प्रक्रियेमधील गृह भेट द्वारे टपाली मतदान प्रक्रिया, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडील प्राप्त वेळापत्रकानुसार गृहभेटी द्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तरी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रातील गृह भेटीद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रिये बाबत गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी या सासूचना करण्यात आल्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.
\