You are currently viewing सायबर चोरट्यांकडून ‘इंटरपोल ते सीबीआय’ नावाने फसवणूक;

सायबर चोरट्यांकडून ‘इंटरपोल ते सीबीआय’ नावाने फसवणूक;

सायबर चोरट्यांकडून ‘इंटरपोल ते सीबीआय’ नावाने फसवणूक;

पोलिसांकडून सतर्कतेसाठी सांगितले ‘हे’ उपाय

पुणे : पुणे शहरात मागील ५ ते १० वर्षांत ज्याप्रमाणे इंटरनेट वापराचे प्रमाणे वाढले आहे. त्याच्या फायदा घेत सायबर चोरटे सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्चशिक्षितांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करीत आहेत.

यासाठी सायबर चोरटे हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (इंटरपोल) पासून ते केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआयचा) वापर करीत आहे. यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी, कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन गुन्हे शाखेच्या आर्थिक आणि सायबर विभाकडून करण्यात आली आहे.

संगणकाच्या युगात अनेक प्रकारे होतेय फसवणूक

सध्याच्या संगणक युगात, इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक असे सगळेच इंटरनेट वापर आहेत. यात ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी-विक्री, खाद्यपदार्थ मागविणे, तसेच अनेक गोष्टी ऑनलाईन माध्यमातून पुरविण्यात येत आहे. या चांगल्या सुविधेबरोबरच काही समाजकंटकाकडून या गोष्टींचा गैरवापर करून नागरिकांना भीती दाखवून, प्रलोभन देऊन, जास्त नफ्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. याचबरोबर सोशल मीडियावर महिलांसोबत ओळख वाढवून त्यानंतर त्यांचे फोटो मार्फ करून ते महिलांना पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे गैरप्रकारदेखील होत आहेत.

नागरिकांना शांत डोक्याने विचार करण्याचा सल्ला

सायबर चोरटे अनेक वेळा विविध केंद्रीय एजन्सींच्या उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याचे भासवून खोट्या सह्यांचे बनावट पत्र तयार करून ते पत्र बनावट ई-मेलच्या माध्यमातून नागरिकांना पाठवतात. तसेच ई-मेलच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या कारवाईची भिती दाखवून ऑनलाईन पैसे भरण्यासाठी भाग पाडून आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे नागरिकांनी शांत डोक्याने, सुरक्षितरित्या, सद्सद्विवेक बुद्धीचा वापर केल्यास होणार मनस्ताप, फसवणूक टाळता येईल, असे गुन्हे शाखेच्या आर्थिक व सायबर विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सध्या ऑनलाईन फसवणुकीचे ट्रेंड तेजीत
ट्रेडिंग फ्रॉड, टास्क फ्रॉड, फेडेक्स फ्रॉड, मॅन ईन मिडल फ्रॉड, फेसबूक फ्रेन्ड रिक्वेस्ट फ्रॉड, मेट्रिमोनी फ्रॉड (लग्न जमविणा-या साईट वरुन होणारे फ्रॉड), सेक्सटॉर्शन, लोन ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. तसेच केवायसी अपडेट, एमएससीबी इलेक्ट्रीक बिल भरले नसल्याचे सांगून लिंक पाठवून संबंधितांचे बैंक अकाऊंट खाली केले जाते. तसेच गुगल वरुन विविध ऑनलाईन सुविधांचा जसे फ्लाईट, हॉटेल, ट्रेन बुकिंग, कुरीअर कॅन्सलेशन आदी करत असताना देखील फसवणूक होवू शकते. ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईट वर कोणतीही वस्तू विकताना किंवा विकत घेताना संपूर्ण खात्री करुनच तसेच समक्ष भेटूनच व्यवहार करावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ऑनलाईन फ्रॉड झाल्यास काय करावे
नागरिकांनी बनावट ईमेल किंवा ऑनलाईन फसवणुकीबाबत सर्तकता बाळगावी. सोशल मीडियावर बदनामी झाल्यास भिती न बाळगता फ्रॉडबाबत, कारवाईची भिती ना बाळगता फसवणुकीच्या घटनेसंदर्भात जवळील पोलीस ठाण्यात, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील सायबर पोलीस ठाणे, (crimecyber.pune@nic.in) या इमेलवर तसेच या नंबरवर ०२०-२९७७१००९७, ७०५८७१९३७१ संपर्क करावा. तसेच १९३० या नंबरवर कॉल करुन आपले सोबत झालेल्या फसवणूकीच्या प्रकाराबाबत माहिती देवून तक्रार करावी किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जावून तक्रार नोंदविण्याचे आवाहन आवाहन पोलीस उप आयुक्त ( आर्थिक व सायबर गुन्हे) विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा