You are currently viewing वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज सादर करा – संतोष चिकणे

वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज सादर करा – संतोष चिकणे

वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज सादर करा – संतोष चिकणे

सिंधुदुर्गनगरी

 सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलीच्या शासकीय वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.तरी संबंधितानी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

           सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलीच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मालवण कणकवली व वेंगुर्ला असे एकूण 3 तसेच मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह, मालवण कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 एकूण 8 शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी, विद्यार्थ्यीनींना 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुक्यास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा (02362 228882) दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

                 शासकीय वसतीगृहात प्रवेश ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने प्रवेश अर्ज करावयाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे. शालेय विद्यार्थी दि. 27 जून ते 12 जुलै 2023 पर्यंत, इ.10 वी व 11वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि. 27 जून ते 31 जुलै 2023 पर्यंत. बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमाध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एम.ए, एम.कॉम, एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका इ. अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि. 27 जून ते 31 जुलै 2023. व्यावसायिक अभ्यासक्रम  व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा