You are currently viewing देवबाग समुद्रात पॅरासेलिंग साहाय्याने मल्लखांब सिल्क एरियल साहसी क्रीडाचे प्रात्यक्षिक

देवबाग समुद्रात पॅरासेलिंग साहाय्याने मल्लखांब सिल्क एरियल साहसी क्रीडाचे प्रात्यक्षिक

देवबाग समुद्रात पॅरासेलिंग साहाय्याने मल्लखांब सिल्क एरियल साहसी क्रीडाचे प्रात्यक्षिक

जागतिक विक्रमवीर रोहन भाटकर करणार सादरीकरण : ७ एप्रिल सकाळी १० वाजता देवबाग संगम येथे आयोजन

मालवण :

मालवण देवबाग गावचा सुपुत्र आणि मुंबईत फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत असलेले रोहन विठ्ठल भाटकर यांनी विविध साहसी विक्रम केले आहेत. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता देवबाग संगम येथील समुद्रात पॅरासेलिंगच्या साहाय्याने कापडी मल्लखांब (सिल्क एरियल) हा अनोखा साहसी क्रीडा प्रकार सादर करून नवा विक्रम बनविण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. याबाबतची माहिती रोहन भाटकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील हॉटेल ऐश्वर्य मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रोहन भाटकर यांच्या समवेत देवबाग येथील पर्यटन व्यावसायिक अवी सामंत, राजन कुमठेकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, विठ्ठल भाटकर, सौ. वर्षा भाटकर, कृपा भालेराव आदी उपस्थित होते.

रोहन भाटकर म्हणाले, मुंबईत आपण फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत असून दादर मुंबई येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरात मल्लखांब या खेळाचा सराव करत आहोत. आपण नेहमीच साहसी उपक्रमात स्वतःची क्षमता आजमावत आलो असून माउंटंट मध्ये रनिंग प्रकारात वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये आपली नोंद झाली आहे. तसेच मोयारसायकल द्वारे ३९ किल्ल्यांची भ्रमंती व मल्लखांब खेळ यासाठी दोन वेळा नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपली नोंद झाली आहे. मल्लखांब मध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करत असून कापडी मल्लखांब हा एक वेगळा साहसी प्रकार सादर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

देवबाग संगम येथील समुद्रात पॅरासेलिंग ला १२ फुट लांबीचे कापड अडकवून कपडाच्या साहाय्याने विविध दहा आसने आपण करणार आहोत. हा एक वेगळा उपक्रम असून याद्वारे मल्लखांब खेळ सर्वांपर्यंत पोहचवून मुलांना या खेळासाठी प्रोत्साहन देणे, फिटनेस बाबत जनजागृती करणे हे यामागे उद्देश असून व हे प्रात्यक्षिक मालवण देवबागच्या पर्यटनासाठीही फायदेशीर ठरेलं असा विश्वास रोहन भाटकर यांनी व्यक्त केला. तसेच या प्रात्यक्षिकासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

*संवाद मिडिया*

*प्रवेश सुरू… प्रवेश सुरू …. प्रवेश सुरू….*

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे…*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.*

*एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न*

*BCA*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी.*

https://sanwadmedia.com/131264/
*कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.*

*अधिक माहितीसाठी :*

*7972997567 /9420274119*

*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा व पुढील गुगल फॉर्म भरावा:*

https://forms.gle/qJoXM6ZdL71FiMXm6

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131264/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा