*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जगणे* (चिऊताई)*
खोपा विणला चिऊताईने
काडी काडी जमवूनी
चिमुकल्या त्या पिल्लांसाठी
पंखांचे बळ एकवटुनी
खुशीत आली चिऊताई
ऊब देई बाळाला
मायेच्या त्या स्पर्शाने
आनंद मनी तीस जाहला
चोच चिमुकली बाळाची
दानापाणी ती देई
पंख फडफडे बाळाचे
उडण्याचे बळ देई आई
उंच भरारी घेई तेंव्हा
चित्त तिचे पिलापाशी
सरसावूनी पिल्ले घेती
हळुच झेप आकाशी
जा बाळांनो नित्य जगा रे
आयुष्याचे क्षण चार
माऊलींची एकच आशा
सांभाळा आपला भार
*शीला पाटील. चांदवड.*