You are currently viewing सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध

सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध

सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध

*मंत्री उदयजी सामंत यांची भेट ही कौटुंबिक; राजकीय चष्म्यातून पाहू नका

* राणे साहेबांना जसे निलेश आणि नितेश तसेच किरण आणि उदय; त्यामुळे ते केव्हाही भेट घेवू शकतात

कणकवली

सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत. किरणजी सामंत, आणि मंत्री उदयजी सामंत हे केद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना वडिलांप्रमाणे मानतात. मानसन्मान देतात. राजकीय सल्ले घेतात. अशावेळी उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री राणे साहेब यांच्यात भेट झाली तर ती कौटुंबिक भेट असते. अधिकार वाणीने घेतलेली भेट असते. अशा व्यक्तीला राजकीय चष्म्यातून पाहू नये. जसे निलेश आणि नितेश आहेत तसेच राणे साहेबांसाठी किरणजी आणि उदयजी आहेत. त्यामुळे मंत्री उदयजी सामंत यांची भेट ही अधिकार वानिणे घेतलेली कौटुंबिक भेट होती. असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.

किरण सामंत हे खूप सरळ आणि साधेपणा अंगीकारलेला माणूस आहे. ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेऊन जशी केंद्रीय मंत्री राणे साहेबांची त्यांना साथ आहे. तशीच त्यांच्या पुढील राजकारणा साठी माझी आणि निलेशजी यांची संपूर्णता साथ राहील. कुठेही आणि कोणीही त्यांना एकट पाडू शकणार नाही. याची मी शाश्वती देतो. किरण सामंत एकटे नाहीत.आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. एकत्र मिळून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार आहोत.अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा